ताज्या घडामोडी

घ्या..भाजपा जिल्हाध्यक्षांनी सुद्धा केली ‘प्रतीक’ची पक्षातून हकालपट्टी…

चांदा ब्लास्ट :

प्रमोद गिरडकर

गडचांदुर:-
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस तथा गडचांदूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा,नगरसेवक अरविंद डोहे यांच्या पत्नी सौ.विजयालक्ष्मी अरविंद डोहे,यांना दारूचे सेवन करून अवाच्च शिवीगाळ करत अपमानित केल्या प्रकरणी कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष ‘नारायण हिवरकर’ यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत 21 आक्टोबर रोजी गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्ता ‘प्रतिक सदनपवार’ याची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली.याच पार्श्वभूमीवर एका महिलेच्या सन्मानार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.हरीश शर्मा यांनी सुद्धा एका पत्राद्वारे ‘प्रतीक सदनपवार’ला पक्षातून निलंबित केल्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष ‘हरीश शर्मा’ यांनी गेल्या 29 आक्टोबर 2023 रोजी काढले आहे.’प्रतिक सदनपवार’ यांनाही पत्र पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

असे असताना ‘मी पक्षातच आहे,तालुकाध्यक्षांना काही समजत नाही’ जिल्हाध्यक्षांनी मला काढले नाही’ असे ठिकठिकाणी सांगत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.मात्र आता खुद्द जिल्हाध्यक्षांनीच याला निलंबित केल्यामुळे खरं काय आणि खोटं काय,समोर आले आहे.
भाजपा पक्ष हा महिलांचा आदर व सन्मान करणारा पक्ष असून असे कार्यकर्ते पक्षाच्या सांस्कृती विरूद्ध वागत असल्याने पक्षातील महिलांचा अपमान होतेय.याचबरोबर पक्षाची प्रतिमा सुद्धा मलीन होते.या व्यक्तीची पक्षातून हकालपट्टी करून पक्षश्रेष्ठींनी एका अर्थाने महिलांना सन्मान व न्यायच दिला आणि नवीन उर्जा,उत्साव निर्माण केला आहे.यापुढे जर हा व्यक्ती पक्ष कार्यात ढवळाढवळ करताना आढळल्यास आम्ही पक्षात राहायचं की नाही ? याचा विचार करावा लागेल.अशी, प्रतिक्रिया पक्षातील अनेक काही महिलांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये