गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

एकूण 15 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त ; रेती चोरीचा गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दि. 06/04/2024 रोजी आम्ही स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग हिंगणघाट पथक तर्फे पो.स्टे. हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करित असतांना, मुखबिरकडून मिळालेल्या माहितीवरून नांदगाव येथील वना नदीचे पात्रात, हिंगणघाट परिसरात नाकाबंदी करून यातील काळ्या रेतीचे वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर पकडले असता आरोपी 1) ट्रॅक्टर चालक मालक – मनोज अशोकराव सावंकार, वय 37 वर्ष, संत गोमाजीवॉर्ड, हिंगणघाट जिल्हा वर्धा, हे वणा नदी पात्रातील नांदगाव परिसरातील घाटातून रेतीची चोरी करुन तिची विक्रीकरिता वाहतूक करीत असतांना मिळून आल्याने आरोपीतांचे ताब्यातुन मोका जप्ती पंचनामा प्रमाणे.,

1) एक निळ्या रंगाचा सोनालीका DI 42 RX कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक नसलेला किंमत 5,00000/-रू 2) एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेल 2,50,000/- रु 3) 1 ब्रास (100 फूट ) रेती किंमत 5,000/-रु. 4) एक लाल रंगाचा महिंद्रा YUNO 575 कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक नसलेला किंमत 5,00,000/-रु, 5) एक लाल रंगाची ट्रॉली क्रमांक नसलेली कि. 2,50,000/-6) 1 ब्रास (100 फूट ) रेती किंमत 5,000/-रु.जु की. 15,10,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी ट्रॅक्टर चालक मालक 2)ट्रॅक्टर चालक  संजय नामदेवराव तडस, वय 43 वर्ष, रा. नांदगाव, ता. हिंगणघाट जि. वर्धा याच्या विरुद्ध पोस्टे :- हिंगणघाट अप क्र:- 502/2024 कलम:- 379 भा.दं.वि.गुन्हा नोंद करून पो. स्टे. हिंगणघाट येथे गुन्हा नोद करण्यात आला.

     सदरची कारवाई माननीय श्री नूरूल हसन पोलीस अधीक्षक वर्धा, माननीय श्री सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शन व निर्देशनाप्रमाणे, पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक श्री मनोज गभणे स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये