ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कष्ट, त्याग आणि संघर्ष हेच यशाचे मार्ग – प्राचार्य डॉ. विजय नागरे

श्री व्यंकटेश महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवण्यासठी किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी जीवाचे रान करा, अपार कष्ट करा, मेहनत घ्या कारण

कष्ट, त्याग आणि संघर्ष हेच यशाचे मार्ग आहेत, असे प्रतिपादन नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड येथील प्राचार्य व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विजय नागरे यांनी केले. श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालय, देऊळगाव राजा येथील ॲड. विजय सुनगत यांची विशेष उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

उन्हाळी २०२३ च्या विद्यापीठ परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र वितरीत करुन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ . विजय नागरे यांनी सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवा यश नक्की मिळेल असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी मोबाईलचा अतिवापर टाळा व दोन वर्ष सातत्याने परिश्रम घ्या यश हे तुमच्या हातात असेल, अशी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. मंजुषा मुळे यांनी केले, प्रास्ताविक समिती समन्वयक प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. अतिथींचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी करुन दिला.

या पदवी प्रमाणपत्र वितरण समारोह प्रसंगी माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये