ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू ; उत्सव लोकशाहीचा साजरा करू 

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीसाठी नियोजनबद्ध तयारी चालू आहे, लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील देऊळगाव राजा येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या माध्यमातून आज विविध उपक्रमातुन मतदानासाठी जनजागृती करण्यात आली.

SWEEP उपक्रमांतर्गत नगरपरिषद देऊळगाव राजा, महसूल विभाग देऊळगाव राजा, शिक्षण विभाग देऊळगाव राजा, सर्व शाळा महाविद्यालय यांच्या सहभागामधून आज दि. 5 एप्रिल रोजी सकाळी शहरातून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत नगरपरिषद देऊळगाव राजा च्या वतीने शहराच्या मुख्य ठिकाणी मतदान जनजागृती पर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद गावातील नागरिकांकडून मिळाला आहे, या सर्व उपक्रमाचे व्यवस्थापन नगरपरिषद देऊळगावराजा यांच्यावतीने करण्यात आले होते.

आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही संदेश मतदाराला देण्यात आला त्यातील काही महत्वाचे वाक्ये पुढीलप्रमाणे,

“गरीब-श्रीमंत, जात-धर्म-लिंग या भेदापासून दूर म्हणजे आपले मत, सर्वांना समान अधिकाराच्या तत्त्वाची प्रतिबिंब म्हणजे आपले मत”

लोकशाहीतील समानतेचे ही मूल्य अधिक बळकट करूया, चला आत्मविश्वासाने मत देण्याचा निर्धार करूया.

“आपलं पहिलं मत,

म्हणजे देशाच्या जडणवीतला पहिले योगदान”

“जागरूक आणि जाणकार मतदार होऊ या, माहितीच्या आधारे योग्य उमेदवार निवडून या”

“प्रलोभन मुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू”

आजच्या या कार्यक्रमाला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ, गटविकास अधिकारी मुकेश महोर, गट शिक्षण अधिकारी मुसदवाले तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये