ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीची दुचाकीला समोरासमोर धडक

एक ठार एक जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – दुचाकीने दुचाकीला दिलेल्या समोरासमोर धडकेत एक ठार तर एक गंभीर रित्या जखमी झाला. ही घटना शनिवार दिनांक सहा ला सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास कोरपना – गडचंदूर मार्गावरील कातलाबोडी – देवघाट फाट्या च्या मधोमध घडली. वृत लिही पावेतो मृतक व जखमी ची ओळख पटली नव्हती. दोघांच्या ही डोक्याला व पायाला गंभीर इजा पोहचली आहे.

या अपघातात एक दुचाकी रस्ता दिभाजकावर तर दुसरी दुचाकी रस्त्यावर पडलेली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय कोरपना दाखल केले.तर गंभीर रित्या जखमीला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये