ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर करार हे विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक – ऍ‌ड. वामनराव चटप

चंद्रपूर जिल्ह्यात विराआंस समितीने केली नागपूर कराराची होळी

चांदा ब्लास्ट

नागपूर करारा द्वारे  दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी  विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट झाला. मात्र या सत्तर वर्षात या कराराद्वारे देण्यात आलेली आश्वासने पाळली नाही. यामुळे विदर्भात अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या. याचा निषेध करण्यासाठी आणि आता स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात नऊ स्थानांवर समिती आणि नागरिकांनी या विदर्भ कराराची होळी करून आपला संताप व्यक्त केला.
                 चंद्रपूर येथील जेटपूरा गेट येथे गांधी पुतळ्यासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ऍडव्होकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वात नागपूर कराराची होळी करण्यात आली. येथे समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, पुंडलिक गाठे, नितीन भागवत, सुदाम राठोड, मारुती बोथले, गोपी मित्रा, अनिल दिकोंंडवार, भूषण चिलके, किशोर दांडेकर, किशोर रामटेके, अरूण सातपूते, नरेंद्र मोहारे यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सावली येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर गेडाम, माजी नगरसेवक नितेश रस्ते, गोपाल रायपूरे,विवेक लेनगूरे,मनोज चौधरी,हंसराज देवगडे, नंदकिशोर सूत्रपवार,भोजराज ढोले,संजय प्रधाने,ए.एम.शेख,श्रावण कुकडकर, संजय भांडेकर,ओमप्रकाश प्रधान, श्रावणा आदे, राजगोपाल तुम्मे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले. चिमूर येथे डॉ.रमेश गजबे, स्थूल सर, नागदेवते सर,पंकज गायकवाड,रवि ढोले,संजय वाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली.
                  राजुरा येथे विद्या आंदोलन समितीचे ऍड.अरुण धोटे, आरपीआय नेते सिद्धार्थ पठाडे,बार असोसिएशन अध्यक्ष राजेश लांजेकर, ऍड.निनाद येरने,ऍड. विजय पुणेकर,ऍड.दुर्गे,विनोद बारसिंगे,बंडू माणूसमारे,केशवराव ठाकरे,कपिल इद्दे,किशोरदास चौधरी,मंगेश मोरे,राहुल बानकर,भिवसन गायकवाड,पिलाजी बोबडे,जुबेर भाई, उत्प्पल गोरे,सुरज गव्हाणे,शाम काटवले,रमेश गौरकार,भाऊराव बोबडे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. गोंडपिपरी येथे रूपेश सूर, ऍड.प्रफुल आस्वले, शंकर पाल,रविंद्र हेपट,गणेश पिंपळशेंडे,आनंद खर्डीवार,डॉ.कुडे, इंजिनिअर अंकुर मल्लेलवार, सत्यपाल डांगी,सुंदर डांगी यांचेसह नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली.
             कोरपना येथे अरुण नवले, रमाकांत मालेकर,अविनाश मुसळे,बंडू राजुरकर,पदमाकर मोहितकर,आमने यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी नागपूर कराराची होळी केली. गडचांदूर येथे निळकंठ कोरांगे, ऍड.श्रीनिवास मुसळे,संतोष पटकोटवार,महादेव नागभीडकर,शेख खाजा,मदन सातपुते,रवी गोखरे,दादा आस्वले, रत्नाकर चटप,स्वप्निल झुरमूरे,गुड्डू काकडे,गणपत काळे,अतुल धोटे यांनी नागपूर करार जाळून आंदोलन केले. जिवती येथे शब्बीर जागीरदार, सय्यद इस्माईल, विनोद पवार, देविदास वारे,उद्धव गोताबळे, श्रीनिवास वाघमारे,गणेश कदम नरसिंग हामने,लक्ष्मण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली. मुल येथे कवडू इनप्रेडीवार,संदेश चिताडे,प्रवीण देशमुख,भावीक घुबडे, बल्लमवार,अरुण येनप्रेडीवार,प्रभाकर चित्रोजवार,शैलेश बावनकर यांचेसह मोठ्या संख्येंने नागरिकांनी नागपूर कराराची होळी केली.
विदर्भ हा नैसर्गिक दृष्ट्या संपन्न क्षेत्र असून गेल्या सत्तर वर्षात विदर्भावर सतत अन्याय झाला आहे. विदर्भातील प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळेच येथे शेतकरी आत्महत्या, कुपोषण,बेरोजगारी, सिंचन अनुशेष, नक्षलवाद, प्रदूषण, बालमृत्यू यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे नागपूर करार हे विदर्भावरील अन्यायाचे प्रतीक असल्याने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यात या नागपूरची होळी करण्यात आली आहे.
           –  ऍड.वामनराव चटप
अध्यक्ष, विदर्भ राज्य आंंदोलन समिती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये