भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर भाजपमधे डेरेदाखल
मुंबई येथे पक्षप्रवेश : सात माजी नगरसेवकांचाहि पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनील धानोरकर यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी आपल्या हातात कमळ घेतले.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, आ.करण देवतळे, शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे आदी मान्यवर ऊपस्थीत होते.
अनील धानोरकर यांच्या सोबतच भद्रावती नगरपरिषदचे माजी नगरसेवक प्रशांत झाडे,प्रमोद नागोसे,निलेश देवईकर,रेखाताई राजुरकर,लिलाताई ढुमने,प्रतिभाताई निमकर,शारदाताई ठवसे आणी व्यापारी असोसिएशनचे प्रविण महाजन हेसुध्दा भाजपवासि झाले आहे. अनील धानोरकर यांनी २००८ ते २०१३ या काळात भद्रावती नगरपरिषदेचे ऊपाध्यक्षपद तर२०१४ ते २०२४ या काळात त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.त्यांच्या कार्यकाळात भद्रावती शहराचा उल्लेखनिय विकास झाला होता.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडी तर्फे विधानसभा निवडणूक लढवली हाेती मात्र त्यांना त्यात पराभव चाखावा लागला होता.
गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होति.अखेर अपेक्षेप्रमाणे ते भाजपवासि झाले. त्यांच्या या पक्षप्रवेशाने शहर तथा तालुक्यातील भाजपचे पक्षीय संघटन अधीक मजबूत होईल असे बोलल्या जात आहे.