ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

20 ऑक्टोंबरला राजापूर येथे कोकणातील मराठी साहित्य मंडळाचे पहिले राज्यस्तरीय काव्य संमेलन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

मराठी साहित्य मंडळाचे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा कोकणातील राजापुर येथे रविवार दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी नगर वाचनालयात सकाळी दहा वाजता आयोजीत करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट राहतील, संमेलनाचे उद्घाटन उद्दोगपती संदीप मालपेकर यांच्या हस्ते करण्यात येईल.स्वागताध्यक्ष राजापुर नगर वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये असून कवी संमेलन च्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ कवयित्री आकांक्षा निगुडकर , रत्नागिरी, राहतील, मुख्य अतिथी म्हणून जेष्ठ कवियीत्री रेखा दिक्षीत,सोलापूर , जेष्ठ कवी सुरेश लोहार,कराड, राहतील. विशेष अतिथी म्हणून माजी पोलिस आयुक्त जेष्ठ लेखक विनायकराव जाधव, कराड, सिद्धार्थ कुलकर्णी, मुंबई,जेष्ठ कवी राजेश थळकर, रायगड, उपस्थित राहणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन लांजेकर, रत्नागिरी या करणार आहेत.

संमेलनात कवी, साहित्यिक, रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कुलकर्णी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये