ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सलग साठ वर्ष राजुरच्या गणरायाचे दर्शन घेणाऱ्या भक्ताचे विश्वस्ताकडून सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुक्यातील दगडवाडी येथील शेतकरी कुटुबांत जन्मलेले व राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेले श्री गणेशजींचे भक्त बाबुराव काकड यांनी गेल्या साठ वर्षापासून मराठवाड्यातील प्रसिद्ध असलेल्या राजुरचा गणपती बाप्पांचे संकष्ट चतुर्थी निमित्ताने कोणताही खंड न पडता दर्शन घेत राहत असल्याने या संस्थांच्या विश्वस्तांनी याची नोंद घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी निमित्ताने बाप्पांच्या दरबारात त्यांचा यथोचित सन्मान केला.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव राजा तालुक्यातील ग्राम दगडवाडी येथील रहिवासी शेतकरी बाबुराव काकड हे वयाच्या 24 व्या वर्षापासून न चुकता श्रीक्षेत्र राजुर गणपती येथे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या दर्शनासाठी जाण्यास सुरुवात केली ते आजपर्यंत त्यांच्या वयाच्या 84 व्या वर्षापर्यंत सलग साठ वर्षे कोणताही खंडन पडू देता 720 वेळा बाप्पांचे दर्शन घेतले 2007 मध्ये ते शरीराच्या व्याधीमुळे जालना येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होते त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती त्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितले मला बाप्पांचे दर्शन घ्यायचे आहे राजूरला घेऊन चला परिवारातील सदस्यांनी तात्काळ डॉक्टरांची सहमती घेत त्यांना राजूरला नेले तेथे दर्शन करून त्यांना परत दवाखान्यात भरती केले ते बाप्पांचे असीम भक्त असल्यानेच हे शक्य होत आहे त्यांनी दगडवाडी व मेव्हणा गट ग्रामपंचायतचे सलग पंधरा वर्षे सरपंच पद भूषविले आहे.

तर देऊळगाव राजा पंचायत समितीचे काही काळ ते उपसभापती होते व खरेदी विक्री संघाचे सुद्धा ते संचालक होते शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या अवलियाने राजकारण समाजकारण करताना त्याला धार्मिक तेची जोड दिली त्यांच्या या भक्तीची दखल घेत श्री राजुरेश्वर गणपती संस्थानचे विश्वस्त जपे यांच्या हस्ते आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने बाप्पांच्या दरबारात बाबुराव काकड यांचा या यथोचित सन्मान करून त्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये