9 फेब्रुवारी पासून देऊळगाव राजा येथे श्रीसंत नरहरिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रतिवर्षी प्रमाणे संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेतील सत्पुरुष श्रीसंत नरहरिनाथमहाराज यांचा २३२वा पुण्यतिथी महोत्सव ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य नामसंकीर्तन महोत्सव 9 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पावेतो संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रतिभावान वक्त्यांची प्रवचन व कीर्तने या महोत्सवात संपन्न होणार आहे.
ह भ प अनिरुद्ध महाराज क्षिरसागर, ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील, ह भ प कान्होबा महाराज देहूकर, ह भ प सदाशिव महाराज पुरंदरे, ह भ प तुकाराम महाराज मुंढे, ह भ प माधवदास महाराज राठी, ह भ प प्रमोद महाराज जगताप, ह भ प उद्बोध मोहननाथ महाराज पैठणकर, ह भ प परमेश्वर महाराज जायभाय यांचे कीर्तन होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन श्रवणाचा व भोजनप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा यांनी केले आहे
पारायण वेळ :सकाळी ८ ते ११
प्रवचन वेळ :दुपारी ४:३० ते ५:३०
कीर्तन वेळ :सायंकाळी ७ ते ९
भोजनप्रसाद :रात्री ९ ते १०
याप्रमाणे असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.



