ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणी येथील इफका केमिकल कंपनीत स्फोट

जीवितहानी टळली, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

चांद ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा जिल्ह्यातील हिंगणी येथील इफका केमिकल कंपनीमध्ये शनिवारी (दि. २७ जून) केमिकल प्लांटमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. मात्र, या घटनेची अधिकृत माहिती देण्यास कंपनी प्रशासनाने नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या प्लांटमधून निघणाऱ्या दूषित धुळीमुळे हिंगणी, धामणगाव आणि नांबर्डी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

याशिवाय, हिंगणी व सेलू येथील पत्रकार प्रतिनिधींना कंपनी परिसरात प्रवेश देण्यास जनरल मॅनेजर विनायक फडणवीस वारंवार नकार देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, हिंगणी येथील लोकमतचे प्रतिनिधी विनोद पोकळे यांना सुमारे तीन ते चार तास कंपनीच्या प्रवेशद्वारावर थांबवून ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. स्फोटाबाबत माहिती मागितल्यानंतरही कंपनीकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर इफका कंपनीत नेमके काय घडले, तसेच पर्यावरण व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे का, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंगणी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये