खा. धानोरकर यांनी गैबिशाह वली दर्गा येथे चादर चढवली

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ पवित्र मोहरम निमित्त चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा कारागृह चंद्रपूर येथील हजरत मखदुम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबिशाह वली (र.अ.) दर्गा येथे आज प्रत्यक्ष भेट दिली. या पवित्र दरगाहस्थळी त्यांनी अत्यंत श्रद्धेने चादर चढवली आणि समाजात सर्वत्र बंधुभाव, सुख, शांतता व ऐक्य नांदावे यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी भावना व्यक्त करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, महाराष्ट्राची खरी ओळख ही विविधतेत एकता जपणारी संस्कृती आहे. सर्व समाजघटकांनी परस्पर आदर आणि एकोप्याने पुढे जावे, हीच या पवित्र प्रसंगी खरी भावना आहे. या भेटीदरम्यान दर्गा कमिटीच्या वतीने खासदार महोदयांचे स्वागत करण्यात आले, ज्यामध्ये कारागृहातील अधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध समाजघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



