ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी विद्यालय येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षिका माधुरी मस्की एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजू आगलावे उपस्थित होत्या.
सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, वामन टेकाम यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री वामन टेकाम यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



