ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल कॉलेज, नांदा येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 27 जून 2026 रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे, संस्थेचे सदस्य श्री. साईदासजी रोगे, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

     सुरुवातीला छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मत मांडले. शिक्षणाला पुढे नेण्यासाठी ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे अग्रगण्य म्हणजेच सर्वात पहिले घेतली जातात. परंतु याबरोबरच ज्यांनी दुसऱ्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले आणि सोबतच आर्थिक मदत सुद्धा केली असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचे नाव सुद्धा आपण नेहमी घेतले पाहिजे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी शिष्यवृत्ती बहाल केली आणि विदेशात लंडन येथे शिक्षणासाठी पाठविले. या अर्थाने छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य सुद्धा महत्त्वाचे ठरते असे मत डॉ. अनिल मुसळे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी केले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले आणि आभार ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी शालिक कांबळे, सविन मडावी, ननीता बुरान, सुशांत खिरटकर, प्रशांत नवले, प्रफुल मुसळे यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये