ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन वर्धा व्दारे धरणे आंदोलन

एक दिवसीय धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन वर्धा व्दारे खाजगी मागणी करीता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याकरिता आंदोलन वर बसलेले आहेत यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत (१) बँक मित्रांना निर्धारित सेवाशर्ती लागू करण्यात याव्यात.(२) बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थ यांना दूर सारले जावे.(३) बँक मित्रांना किमान मेहनताना दिला जावा ज्यासाठी त्यांच्या कडून किमान निर्धारित काम करून घेतले जावे व व्यवहारासाठी योग्य त्या दराने कमिशन दिले जावे.

यात निर्धारित काळानंतर योग्य ती वाढ करण्यात यावी.(४) बँक मित्रांच्या नेमणुका भौगोलिक सिमा खात्यांची संख्या व्यवहार या निकषांवर केल्या जाव्यात.(५) बँक मित्र देत असलेल्या सेवांसाठी जागा वापरत असलेला डाटा स्टेशनरी वाहन खर्च याची भरपाई देण्यात यावी.(६) बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्थ कायदेशीर (QUASI LEGAL ) विवाद निर्माण झाले तर त्याचा निपटारा करण्याची जबाबदारी बँकेने घ्यावी.(७) बँक मित्र ते करत असलेल्या कार्यालयीन कामकाजाचा भाग म्हणून पैशांची ने आण करतात.यातील जोखीम लक्षात घेता त्या रकमेचा विमा काढला जावा.यात अपघात अथवा मृत्यू आला तर त्याचाही विमा काढला जावा.(८) बँक मित्रांना प्रोव्हिडेंट फंड ग्रॅच्युइटी पेन्शन या सामाजिक सुरक्षितता योजना लागू करण्यात याव्यात.(९) बँक मित्रांना आर्दश आचार संहिता लागू करण्यात यावी.(१०) बँक मित्र सखी म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना बाळंतपणाची रजा इस्पितळाचा खर्च देण्यात यावा.(११) बँक मित्रांना स्वस्त व्याजदराने व्यवसाय विकसित करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.

या मागणीसाठी देविदास तुळजापूरकर अध्यक्ष दिपक पाटील जनरल सेक्रेटरी विरल काळे जिल्हा प्रतिनिधी राजेश दुपारे अतुल काळे योगेश गावंडे होमदेव नरुले संदिप कळसकर चंद्रभान जोगे प्रफुल्ल सोनकुसरे मोहन कुमार ढाक रोशन कडू सुरज कांबळे आशिष हातमोडे प्रतिक्षा कळसकर साधना भिडवाईक ममता बुरानकर शुभांगी येले प्रशांत नारायणी इत्यादी मोठ्या संख्येने बँक सहकारी मित्र मंडळी धरणे आंदोलनात सहभागी होते…..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये