ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचा परदेश शिक्षणासाठीचा झारीतील शुक्राचार्य ठरणारा शासन निर्णय रद्द करा

आ. धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० ऑक्टोबर २०१३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाला आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध दर्शवला आहे. या शासन निर्णयामुळे भविष्यात परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, अशी  निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून झारीतील शुक्राचार्य ठरणाऱ्या या शासन निर्णयाला रद्द करण्याची विनंती केली आहे.

     या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या शासन निर्णयामुळे परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येणार आहेत. यामध्ये वार्षिक ८ लाखा खाली उत्पन्न असलेल्या पालकांचा पाल्य पात्र ठरणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ होणे, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या व्हिसाची प्रक्रिया अधिक कठीण होणे आणि विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेच्या निकषांमध्ये वाढ होणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची अट  कोणत्याच राज्यात नसल्याने महाराष्ट्र राज्यसरकारच्या या निर्णयाच्या विरोध समाज बांधव करीत आहेत.

या पत्रात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली आहे की, त्यांनी या शासन निर्णयाला रद्द करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.

या पत्राची प्रत त्यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सहसचिवांनाही पाठवली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये