निळकंठराव शिंदे महाविद्यालयातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :- निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीमध्ये NCC कॅडेट्स तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाविद्यालयापासून ते भद्रावती शहरात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान कॅडेट्सनी ‘भारत माता की जय’ , हर घर तिरंगा , घर घर तिरंगा अशा देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
रॅलीचे आयोजन सकाळी १० ते ११ वाजता करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना चे प्रमुख लेप्ट. डॉ सचिन श्रिरामे , राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख डॉ कुलदीप भोंगळे व विद्यार्थी विकास योजना विभागाचे प्रमुख डॉ राजेश हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले.



