ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आशिष रणदिवे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले

प्रसारमाध्यमांतील दिशाभूल करणारे वृत्त चुकीचे असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- भाजपा प्रणित कामगार आघाडीचे महामंत्री आशिष रणदिवे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावरून सुरू झालेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये रणदिवे यांच्याबाबत प्रसिद्ध झालेले काही वृत्त खोटे व दिशाभूल करणारे असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
वरोरा नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेना उबाठा तर्फे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती मात्र ते आजतागायत भाजप मध्येच सक्रिय होते हे विशेष.

रणदिवे यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे ७ ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला, अशी माहिती यावेळी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या प्रखर भूमिकेवर विश्वास व्यक्त करत रणदिवे यांनी पक्षात प्रवेश केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला निश्चितच बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, तालुकाप्रमुख नरेश काळे, उपतालुकाप्रमुख गोलू गेडाम, अश्विन (बंटी हेमके), बंडू डाखरे, विधानसभा प्रमुख, शहर संघटक बंडू चटपल्लीवार, तालुका संघटक सचिन डुकरे, शहर संघटक पुरुषोत्तम नैताम आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. धनुष्यबाण पुन्हा ठाकरे कडेच येईल हि या पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये