ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिपब्लिकन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी चंद्रपूरच्या पंधरा तालुक्यात प्रशिक्षण शिबीर यांचे आयोजन करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यात यावी. असा सर्व उपस्थित प्रशिक्षण शिबिरार्थीचा सूर होता.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तारीख २७ सप्टेंबर २०२६ ला ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल चोरखिडखी चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षण शिबिराचे

माजी जिल्हाध्यक्ष तथा नागरिक प्रदेश उपाध्यक्ष मा. बाजीरावजी उंदिरवाडे यांनी उद्घाटन केले. यावेळी प्रशिक्षक तथा नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस प्रा. रविंद्रनाथ पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष गुरूदास रामटेके, संतोषभाई रामटेके इत्यादी उपस्थित होते.

शिबिराला अशोककुमार उमरे चिटणीस महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा संघटक रमेश पाटील गडचांदूर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष अजय चव्हाण, जेष्ठ कार्यकर्ते जि. एस. कांबळे गुरूजी, मुकेश मेश्राम, जनार्दन वाघमारे, जिवन डांगे, देविदास दुर्गे, राजेंद्र भगत, मारोतराव रायपूरे, सुरेश फुलझेले, हंसराज ताकसांडे उपरवाही, अश्विन दुबे, संतोष धोटे, अजय पाटील इत्यादींनी शिबिरात सहभाग घेतला.

समारोपीय कार्यक्रमात बाबासाहेबांच्या काळापासून राजकीय पक्षांच्या आघाडीची फौज असलेल्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाला सुद्धा वेळ देऊन रिपब्लिकन कार्यकर्ते आणि दलाचे सैनिक प्रशिक्षित करण्याच्या आवश्यकतेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोककुमार उमरे यांनी भर दिला. तसेच माजी जिल्हाध्यक्ष तथा नागपूर प्रदेश उपाध्यक्ष बाजीरावजी उंदिरवाडे यांनी

 रिपब्लिकन पक्ष गतीमान करण्यासाठी आणि उदासीनता दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिराची आवश्यकता असल्याचे सांगितले.

नागपूर प्रदेश सरचिटणीस आणि कार्यशाळा प्रशिक्षक सिद्धार्थ सुमन तब्बल अकरा ते पाच वाजेपर्यंत सहा तास प्रशिक्षणार्थी यांना खेळीमेळीच्या वातावरणात खिळवून ठेवून उपयुक्त प्रशिक्षण दिले.

प्रा. रविंद्रनाथ पाटील जिल्हा सरचिटणीस यांनी बरीच धावपळ करून प्रशिक्षण कार्यशाळा शिबिराचे आयोजन केले आणि यांच्या धावपळीला सुद्धा यश आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. रविंद्रनाथ पाटील यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये