पत्रकारांविषयी आक्षेपार्ह विधानाचा निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
फेसबुक व व्हाट्सअप सारख्या समाज माध्यमावर आक्षेपहार्य कॉमेंट व अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार काही समाजकंटकांनी केला. या प्रकाराचा देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी व इतर सदस्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदविला असून पत्रकार म्हणून एक प्रकारे एकीचा संदेश दिला.
तालुका पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघ, मातृतीर्थ पत्रकार संघ व तानुबाई बिरजे पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगरपालिके समोर गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणा संदर्भात कचरा डेपो हटाव मोहीम नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर तालुक्यातील उंबरखेड अंभोरा जांभोरा जवळखेड व असोला जहागीर येथील काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकाराविषयी आक्षेपार्य कमेंट केल्या, लोकशाहीत सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे मात्र व्यक्ती स्वतंत्र्याची सीमारेषा ओलांडून पत्रकारांविषयी घाणेरड्या शब्दात व अश्लील भाषेत कॉमेंट करण्यात आल्या, याच बरोबर स्वयं देव येथील सरपंच दीपक कायंदे यांच्या फेसबुक पोस्टवर ही आक्षेपार्य संदेश टाकण्यात आले.
या प्रकाराचा निषेध नोंदवून पत्रकारांविषयी घाणेरड्या भाषेत केलेल्या सार्वजनिक कॉमेंट यापुढे सहन केले जाणार नाही असा इशारा देण्यात आला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मुशीरखान कोटकर, कार्याध्यक्ष सुनील मतकर, जिल्हा सदस्य शिवाजी वाघ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विलास जगताप,मातृतीर्थ पत्रकार संघाच्या संस्थापक सुषमा राऊत, कानबाई बिर्जे पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर देशमुख यांच्यासह सुरज गुप्ता अर्जुन आंधळे संतोष जाधव मोहम्मद जमील मंगेश तिडके प्रभाकर मान्टे, राजेश पंडित मुन्ना ठाकूर, प्रदीप हिवाळे पूजा कायंदे उषा डोंगरे शेख कबीर विजय जाधव चंद्रभान जिने राहुल नायर, देवानंद झोटे शंकर शिवरकर किशोर जामदार गुलाम अहमद क्षितिज दर्जे गणेश मुंडे रफिक सय्यद शब्बीर पठाण अश्रफ पटेल गजानन घुगे, सन्मति जैन दीपक नागरे अमोल बोबडे विठ्ठल पन्नासे यांच्या स्वाक्षरी आहे.



