राष्ट्रीय कराटे स्पर्धेत वॉरियर्स मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट क्लब कोरपनाचे घवघवीत यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
उज्जैन येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धा 2026 मध्ये वॉरियर्स मार्शल आर्ट्स आणि स्पोर्ट क्लब, कोरपना च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 6 पदके पटकावली.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदके मिळवून कोरपना चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले.
पदक विजेते खेळाडू :
1. प्रेम मुरलीधर सलाम— 🥇 सुवर्ण पदक
2. प्रतीक बालाजी नरवटे — 🥇 सुवर्ण पदक
3. सिद्धांत प्रवीण पेटकर— 🥈 रौप्य पदक
4. श्रीओम् कृष्णा घोसे— 🥈 रौप्य पदक
5. नैनिशा नागार्जुन कोमिनेनी— 🥈 रौप्य पदक
6. परी कृष्णा घोसे— 🥈 रौप्य पदक
या यशाबद्दल सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे वॉरियर्स मार्शल आर्ट ॲन्ड स्पोर्ट क्लब कोरपना तसेच पालक, क्रीडाप्रेमी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सुरज खोबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले. या यशामुळे कोरपना परिसरातील युवा खेळाडूंमध्ये कराटे आणि मार्शल आर्ट्सबद्दल उत्साह निर्माण झाला असून, राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश परिसरासाठी अभिमानाची बाब ठरले आहे.



