ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरात मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. अठरापगड जातींच्या सामाजिक न्याय व हक्कांसाठी जनजागृती करण्याचा संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे डॉ. यशपाल भिंगे यांच्या नेतृत्वाखाली, तर संयोजक मोरेश्वर भोदे यांच्या मार्गदर्शनात ही मंडल यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी वरोरा व भद्रावती तालुका तसेच शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भद्रावती शहरात मंडल यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष भूपेश कायरकर, तालुका प्रमुख सुमित मुडेवार, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, सुभान भाई सौदागर, प्रशांत काळे, सूरज गावंडे, अनिल पडोळे, संदीप चटपकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वरोरा शहरात शहर कार्यकारिणी तर्फे काँग्रेस चे प्रवीण काकडे यांचे नेतृत्वात स्वागत करण्यात आले.

मंडल आयोगाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाला मिळालेल्या सामाजिक न्यायाच्या अधिकारांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे तसेच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करणे, हा या मंडल यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यात्रेला जिल्ह्यात विविध ठिकाणी नागरिक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये