ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब व इनर व्हील क्लब भद्रावती चा पदग्रहण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती:- रोटरी क्लब भद्रावती डिस्ट्रिक्ट 3030 यांच्या २०२६–२७ या रोटरी वर्षासाठी नूतन अध्यक्ष, सचिव व नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे संपन्न झाला.
या सोहळ्यात माजी अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी सुधीर पारधी यांना अध्यक्षपदाचा , विक्रांत बिसेन यांनी सुरेंद्र राऊत यांना सचिव, किशोर भोस्कर यांनी प्रकाश पिंपळकर प्रकल्प सचिव तर आनंद क्षीरसागर यांनी महेंद्र गावंडे कोषाध्यक्ष पदाचा पदभार सोपवला. तर इनर व्हील क्लब भद्रावती च्या अध्यक्ष मनिषा ढोमणे, सचिव रश्मी बीसेन , कोषाध्यक्ष पूजा महाजन , चेअरमन प्रेमा पोटदुखे ,ISO निरूपा भालोदीया , एडिटर हेमलता ठिकरे यांनी पदभार स्वीकारला.

या सोहळ्याला रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर . डॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली निलेश परतानी (डीजीएनडी), श्रीनिवास लेले (डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी ), डॉ. संदीप मुडे (असिस्टंट गव्हर्नर), राजेश गडीकर फार्मर् सेक्रेटरी, अनिल धानोरकर माजी नगराध्यक्ष तसेच भाविक तेलंग यांची उपस्थिती होते.

कार्यक्रमास मुकेश जिवतोडे जिल्हा संघटक शिवसेना शिन्दे गट संघटक चंद्रपुर जिल्हा, भद्रावती नगर परिषद चे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी,डॉ. माला प्रेमचंद, ॲड. युवराज धानोरकर चंद्रपूर जिल्हा प्रमुख शिवसेना,तसेच सुनील पोटदुखे , वंदना धानोरकर, रुखसाना शेख, शेहनील अजानी,केशनी हटवार, मेघा शेंडे, सीमा पवार , अश्विनी लेडांगे इनर व्हील क्लब भद्रावती ब्लॉसम च्या अध्यक्ष वर्षा धानोरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समाजहित, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवक विकास आणि सेवाभावी उपक्रमांद्वारे रोटरी क्लब भद्रावतीने सामाजिक कार्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन सरप टवार सर यांनी केले

आयोजित या पदग्रहण सोहळ्यास रोटरी पदाधिकारी पास्ट प्रेसिडेंटअविनाश सिद्धमशेट्टीवार, किशोर खंडाळकर, विनोद कामडी किशोर पत्तीवार ,आत्माराम देशमुख , विवेक आकोजवार, दिलीप राम, गिरीश सूत्रपवार,वसंत उंमरे , नामदेव खारकर संजय बोरकुटे ,अजय बोंडे, मनोहर नागपुरे ,मेजर मारुती महातळे, मनीश श्रीवास्तव, संदीप ढेंगळे , डॉ ज्ञानेश हटवार संपादक सेवा समाचार, पत्रकार बांधव,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये