ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अत्यंत धक्कादायक व संतापजनक : कच्चा चिवड्यात पाल आढल्याने एकच खळबळ : ६ जणांना विषबाधा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        अत्यंत धक्कादायक व संतापजनक बातमी समोर आली. वरोरा बस स्टॉप रोडवरील आयटीआय (ITI) लागून असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ दुकानातून खरेदी केलेल्या चिवड्यात चक्क पाल आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दूषित चिवडा खाल्ल्यामुळे तब्बल सहा नागरिकांना तीव्र विषबाधा झाली असून, वरोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुकानांवर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विषबाधा झालेल्या सर्व सहाही रुग्णांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले तिथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण सुवर्णा प्रवीण कोहळे वय ४५ वर्ष रा. माजरी, प्रविन शालीकराम कोहळे वय ५० वर्ष रा. माजरी, पंकज दिगंबर आवारी (वय ४० वर्ष रा. राळेगाव, दिगाबर विठ्ठजी आवारी रा. राळेगाव, अफजल रफीक खान रा. भद्रावती, शेख रेहमान रा. कोरेगाव, आयुब सागीर खान रा. भद्रावती यांनी उपचार केला. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये