ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वानराच्या मागे धावताना बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वानराचाही मृत्यू : वगाडपेठ येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

चिमुर :_ वनपरिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपवनक्षेत्रातील वगाडपेठ परिसरात वानराचा पाठलाग करताना विजेच्या डीपीवर चढलेल्या मादी बिबट्याचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत वानराचाही मृत्यू झाला आहे.

पिंपळगाव येथील शेतकरी महादेव धारणे यांच्या शेतात विद्युत डीपी आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास या डीपीवर वानर असल्याचे दिसून आले. त्याच्या मागे मादी बिबट्या चढल्याने विद्युत प्रवाहाचा धक्का लागून बिबट्या आणि वानराचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

    सोमवारी सकाळी महादेव धारणे शेतात गेले असता त्यांना डीपीजवळ बिबट्या व वानर मृतावस्थेत आढळले. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर, वनपाल राजेंद्र मेश्राम, वनरक्षक कालिदास गायकवाड व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृत प्राण्यांना खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले यावेळी ब्रह्मपुरीचे उपवन संरक्षक डॉ कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकर पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ.रमेश कुमार ओव्हाळ शंकरपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ मनोज पाटील, चैतन्य सोनुले,वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, वनपाल राजेंद्र मेश्राम, वनरक्षक कालिदास गायकवाड यांच्या समक्ष शवविच्छेदन करून दहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये