ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मत्स्यव्यवसाय सहकारी संघाच्या वार्षिक सभेत विविध विषयांवर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      चंद्रपूर जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ मर्यादित, चंद्रपूरची सन २०२५-२६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २८ सप्टेंबर रोजी जिल्हा भोई समाज सेवा संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष यादवराव मेश्राम होते.

सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तास मंजुरी, सन २०२५-२६ चे आर्थिक पत्रक, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकास मंजुरी, अंदाजपत्रकापेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चास मान्यता तसेच लेखापरीक्षण अहवालावर चर्चा करण्यात आली. पुढील वर्षासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती, भागधारक संस्थांकडील थकीत कमिशन वसुली आणि नवीन सभासदत्वासाठी प्राप्त अर्ज यावरही चर्चा झाली.

यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक यशवंत दिघोरे, संचालक दिलीप मांढरे, संचालक तथा नगरसेवक बंडूभाऊ हजारे, दिवाकर डहारे, जितेंद्र टिंगूसले, ठाकूर आदी उपस्थित होते.

सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष यादवराव मेश्राम यांनी केले. अहवालाचे वाचन लक्ष्मण ठाकरे यांनी केले, तर संचालन व आभार प्रदर्शन दिवाकर डहारे यांनी केले. सभेत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये