संकेत वानखेडे व कार्तिक आश्रम यांची बॉक्सिंग स्पर्धेत नागपूर विभागावर निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक भद्रावती येथिल विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीतील विद्यार्थी वयोगट 19 वर्षे खालील जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा वजन गट 75 ते 80 किलो यात संकेत वानखेडे आणि वजन गट 64 ते 66 किलो यात कार्तिक आत्राम यांनी आपल्या क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करीत चंद्रपूर जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून नागपूर विभागीय स्पर्धेत खेळण्याकरित आपली पकड मजबूत केली. या विद्यार्थी खेळाडूंना शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका कु. संगीता आर. बांबोडे तसेच प्रशिक्षक लता इंदुरकर (तिवारी) यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थी खेळाडूंच्या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जयंतराव टेमुर्डे, सचिव अमनभाऊ टेमुर्डे तसेच विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सर्व पदाधिकारी आणि विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, डॉ. सुधीर आष्टुनकर, प्रा. कापगते, प्रा. दाते, प्रा. बैरम, प्रा. चौधरी, प्रा. ढोके, प्रा. गेडाम, प्रा. आसूटकर आणि सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.



