ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रलंबित ठेवींची पडताळणी, उपलब्ध निधी व मालमत्तेची सखोल तपासणी करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ठेवीदारांकडून प्राप्त माहिती व उपलब्ध कागदपत्रांनुसार अंदाजे ₹25 ते ₹30 कोटींच्या मुदतठेवी प्रलंबित असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याची अधिकृत पडताळणी करून प्रत्यक्ष प्रलंबित रक्कम, प्रभावित ठेवीदारांची संख्या आणि संस्थेची आर्थिक स्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
पिंपळशेंडे यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण, ठेवींची पडताळणी, उपलब्ध निधी व मालमत्तेची सखोल तपासणी करण्याची मागणी केली. तसेच मुदतपूर्ती झाल्यानंतरही पैसे न मिळाल्याबाबत संस्थेच्या व्यवस्थापनाकडून लेखी स्पष्टीकरण घेऊन आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आवाहन केले.

ठेवीदारांकडे एफडी प्रमाणपत्रे, मॅच्युरिटी कागदपत्रे, बँक उतारे, अर्ज व पावत्या उपलब्ध असल्याचे सांगत या कागदपत्रांच्या आधारे प्रत्येक ठेवीदाराची प्रत्यक्ष प्रलंबित रक्कम निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करावे आणि चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये