ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ढोल-ताशा, आकर्षक रोषणाई व भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

चोख पोलिस बंदोबस्तात विसर्जन सोहळा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात भद्रावती शहरात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. आकर्षक रोषणाई, मनमोहक सजावट, वाद्यांचा गजर आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. आसना तलाव, गवराळा येथे नगरपरिषदेने केलेल्या नियोजनबद्ध विसर्जन व्यवस्थेत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन खेत्रे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष नियोजन केले होते.

दरम्यान, विविध राजकीय पक्षांच्या वतीने गणेश मंडळांच्या अध्यक्ष, सचिव तसेच पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शहर काँग्रेस अध्यक्ष भूपेश कायरकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनील नामोजवार, गटनेत्या सरिता सूर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे शहराध्यक्ष किशोर गोवारदिपे यांच्या नेतृत्वाखाली आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रघुवीर हंसराज अहिर, अनिल धानोरकर, वृषाली पांढरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उबाठा शिवसेनेचे शहरप्रमुख बंटी हेमके तसेच जिल्हाप्रमुख भास्कर पाटील ताजने आणि माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे यांच्या हस्ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख नरेश काळे, अमित निब्रड, आशिष रणदिवे आदी उपस्थित होते.

तर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सुधीर सातपुते, विधानसभा समन्वयक नकुल शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आसना तलावावर नगरपरिषदेची चोख व्यवस्था

मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भद्रावती नगरपरिषदेने आसना तलाव, गवराळा येथे विसर्जनासाठी विशेष व्यवस्था केली होती. विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा, स्वच्छता व इतर व्यवस्थेची काळजी घेण्यात आली. नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेताना दिसून आले.

आमदार करण देवतळेंचा वाद्यांच्या तालावर ठेका

विसर्जन मिरवणुकीत तरुण आमदार करण देवतळे यांनीही वाद्यांच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. त्यामुळे मिरवणुकीतील जल्लोषाला आणखी रंगत आली.

सुंदर सजावट, आकर्षक रोषणाई, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात भद्रावतीतील गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. भक्ती, उत्साह आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत गणेशोत्सवाची सांगता झाली.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर तसेच आमदार करन देवतळे यांनी राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व कष्टकरी बांधवांना गणरायाने अभय द्यावे, अशी प्रार्थना केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये