ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू पोलीसांकडून गोवंशाची निर्दयतेने वागणुक देवून वाहतुक करतांना वाहनास पकडण्यात यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २६.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ चे रात्रदरम्यान पोलीस स्टेशन सेलू येथे सहायक फौजदार राकेश देवगडे ब.नं.११४ व पोलीस अंमलदार मोहसीन शेख हे पोलीस स्टेशन परिसरामध्ये नाईट पेट्रोलींग करीता असतांना मिळालेले माहिती नुसार रात्री ११.३० वा.चे सुमारास नागपूर ते वर्धा हायवे रोडवरील केळझर शिवारात नागपूर कडून वर्धेच्या दिशेन जात असलेले आयशर ट्रक क्रमांक एम.एच.४०-वि.जी. -९१६४ ची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवंश गोरे, बैल व एक सांड असे एकुण २२ गोवंशांना आरोपी अज्ञात वाहन चालकाने निदर्यतेने व कुरतेची वागणुक देवून कोणताही चारापाणी न पुरविता वाहतुक करतांना आढळून आला, त्यानुसार सदर ठिकाणी सहायक फौजदार राकेश देवगडे ब.नं.११४ व पोलीस अंमलदार मोहसीन शेख ब.नं. १६१४ यांनी चौकशी केली असता सदर वाहन चालक हा वाहन सोडून पसार झाल्याने सदर वाहनामध्ये मिळून आलेले एकुण २२ गोवंश यांना सुरक्षितरित्या वाहन दुरूस्त करून नालवाडी येथील स्व. राधाकृष्ण बजाज गो-शाळाचॅरिटेबल ट्रस्ट येथे सुखरूप दाखल केले आहे, सदर प्रकरणी गोवंशांची वाहतुक करणारा आयशर ट्रक क्रमांक एम.एच.४०-बि.जी.-९१६४ किंमत १५,००,०००/- रूपये तसेच एकुण २२ गोवंश किंमत ५,४५,०००/- रूपये असा एकुण जुमला किंमत २०,४५,०००/- रूपयांचा माल ताब्यात घेवून सदर आयशर ट्रक क्रमांक एम.एच.४०-बि.जी.-९१६४ चे अज्ञात चालकाविरूध्द पोलीस स्टेशन सेलू येथे अपराध कमांक ८६८/२०२६ कलम ११(१) (डी), ११ (१) (ई), ११(१) (एफ), ११ (१) (आय) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ५ ए (१),९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ सहकलम ८३,१७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधिक्षक, वर्धा, मा.श्री. सदाशीव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा मा.श्री. सुनिल महाडिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांचे मार्गदर्शनामध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. पंकज वाघोडे, ठानेदार पो.स्टे. सेलू तसेच सहायक फौजदार राकेश देवगडे ब.नं. ११४ व पोलीस अंमलदार मोहसीन शेख ब.नं. १६१४ पोलीस स्टेशन सेलू यांनी केली आहे.

पंकज वाघोडे, सहायक पोलीस निरीक्षक ठानेदार पो.स्टे. सेलू

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये