ताज्या घडामोडी

हिंगणघाट शहरामधील दारू विक्रेत्या महिला यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदयाअन्वये केली कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक. 27/09/2026 रोजी गणेश उस्तव विसर्जनच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हिंगणघाट शहर अंतर्गत दारू विक्रेता महिला यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदया अन्वये एकुन 9 गुन्हे नोंद करून 40,120/- रू चा दारू मुद्दे‌माल जप्त करून एकुन 8 महिला आरोपी यांना कायदेशिररित्या गुन्हयात अटक करून मा. न्याय दंडाधिाकरी प्रथम वर्ग न्यायालय हिंगणघाट यांचे समक्ष एम.सी.आर वर हजर केले असता मा. न्यायालयाने एम.सी.आर मंजुर करून जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्धायेथे पाठविण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा, मा. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सुशिल नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग हिंगणघाट, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार / पोलीस निरीक्षक अनिल राउत पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे निर्देशावरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील अधिकारी व अमलंदार यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये