ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमगाव जंगलात अस्वलीचा हल्ला; इसम गंभीर जखमी

वनविभाग कडून तात्काळ मदतीची हाक या पूर्वी ही या गावातील एका इसमाचा वाघाच्या हल्यात झाला होता मृत्यु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 अमगाव जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास एका इसमावर अस्वलीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात रमेशराव ढोळे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेशराव ढोळे हे अमगाव जंगल परिसरात असताना अस्वलीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या शरीरावर तसेच डोक्याच्या भागावर गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करावे, अशी मागणी होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये