ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वेशभूषा स्पर्धेत चिमुकल्यांनी घडविले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

जिल्हा परिषद शाळा गोजोली मक्ताचा स्त्यूत उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :-  पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गोजोली मक्ता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी वेशभूषा फॅन्सी ड्रेस तसेच नृत्य स्पर्धेचे आयोजन नुकत्याच करण्यात आले होते. आदिवासी संस्कृतीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला स्पर्धेत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्फुर्त सहभाग नोंदविला.

विविध आदिवासी वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी नृत्य, पोशाख प्रदर्शन तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्य सादर करीत विद्यार्थ्यांनी गोंडी गाण्यांवर आकर्षक आणि नयनरम्य नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक मुरलीधर सरकार यांनी भूषविले तर विषय शिक्षक जतिन धोटे, भावेश विश्वास, शिक्षिका साधना उराडे यांची प्रामुख्याने प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले.

खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या आनंददायी स्पर्धेत तनुष्का कडते, अन्वी शेंडे, रितू मोहुरले, नंदिनी शेडमाके, प्रतीक्षा ठाकरे, हर्षाली सोनुले, आरोही आदींनी सहभाग घेतला.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रितू मोहुरले तर आभार हर्षाली सोनुले यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक, गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये