Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

टेकामांडव्यातील आकाशचा पहिला पगार जि.प.शाळेसाठी !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- नोकरीला लागल्यानंतर पहिल्या पगारावर अनेकांची वेगवेगळी स्वप्ने असतात आणि ते आपापल्या परीने पूर्णही करीत असतात. आयुष्यातील पहिली कमाई अनेकजण ईश्वराच्या चरणी ठेवतात, आईवडिलांना देतात. पहिली कमाई देताना त्यांच्या मनात एक वेगळी भावना असते.

परंतु अशा सर्व गोष्टींना फाटा देणाऱ्या तालुक्यातील आदर्श टेकामांडवा या गावात पाहावयास मिळाला. चंद्रपूर पोलीस विभागात वाहन चालक या पदावर निवड झाल्यानंतर आकाश सोलनकर यांनी जिल्हा परिषद टेकामांडवा शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माझा पहिला पगार शाळेसाठी देईल अशी घोषणा केली होती.

व त्याप्रमाणे त्यांनी ती पूर्णत्वास नेली. तालुक्यातील लोकसहभागातून लाखोंचा निधी जमा करून शाळेचे रुपडे पालटणाऱ्या टेकामांडवा शाळेला याच शाळेचा माजी विद्यार्थी आकाश सोलनकर यांनी त्याच्या पहिल्या पगारातून पंधरा हजार रुपयांच्या किमतीची साऊंड सिस्टिम शाळेला भेट दिली. आकाश सोलनकर यांचे वडील केशवराव सोलनकर यांच्या हस्ते शाळेला सदरील साहित्य सुपूर्द करण्यात आले.

त्याच्या या अभिनव कार्याबद्दल गावातील सर्व नागरिक, पालक अनेक मान्यवर व वेगवेगळ्या स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. यावेळी शाळेतील शिक्षक लचु पवार, किसन बावणे, दीपक गोतावळे, रुपेश मांदाळे, उषा डोये, मुखळा मलेलवार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये