ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

१८० रुग्णांनी घेतला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र, हसन इलेक्ट्रिकल, सहयोग बहुउद्देशीय संस्था कोरपना च्या वतीने विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर रविवार दिनांक १४ ला स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आश्रम शाळा कोरपना येथे घेण्यात आले. या शिबिराचा एकशे अंशी रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये ७४ विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर साठी निवड झाली.

या कार्यक्रमाला सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अजय शुक्ला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोडे, लायन्स क्लब अध्यक्ष मृणाली धोपटे , सचिव जया सातपुते, महावीर इंटरनॅशनल अध्यक्ष विर त्रिशूलबम, लता वर्मा, सामाजिक कार्यकर्ते किशोर बावणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप बांबोळे, वैद्यकीय अधिकारी आकाश जीवने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या शिबिराचा कोरपना तालुक्यातील विविध गावातून मोठ्या संख्येने रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग बहुउद्देशीय संस्थाचे विशाल गज्जलवार, जयवंत वानखेडे, डॉ दीपक मेश्राम, हफिज शेख, प्रशांत रामगिरवार,दादा आडकिने, पुरुषोत्तम भोंगळे, अरुण मडावी,दिनेश खडसे, महेश गारघाटे, दीपक पेटकर, अनुप रणदिवे, राजू मालेकर, जगदीश पेटकर, क्रिष्णा उपलंचीवार, राजू कोटावार, किशोर मालेकर, कवडू घुघुल, दिनेश पडगिलवार, अविनाश आडकिणे, संतोष मालेकर, सतीश गजलवार, संदीप इंगळे, बालाजी मसे, जगन पाचभाई आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये