मेंडकी ते नवेगाव एकारा रस्त्याची दैनावस्था : प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी ते नवेगाव एकारा पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जंगलव्यापी मार्ग आहे.सदर रस्त्याने प्रवास करताना शेतकरी, मोलमजूर व कर्मचारी शालेय विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाची बरेचदा अपघात झाले आहेत.परंतु शासनाचे या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे की काय असा प्रश्नचिन्ह समस्त गावकऱ्यांनी केला आहे.
या मार्गाने वन्य प्राण्यांची भीती आहे.भरदिवसा वाघाचे दर्शन घडवून येत आहे.भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मार्गाने प्रवास करताना बऱ्याच महिन्यांपासून प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.मेंडकी ते नवेगाव एकारा रस्त्याची दैनावस्था झाली असून एक दिवस मोठी घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार असे सुद्धा परिसरात बोलले जात आहे. सदर रस्त्याने सिंदेवाही, चंद्रपूर जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची दर्वळ असतो. या संदर्भामध्ये गावातील सरपंच यांनी बांधकाम विभागाला तोंडी व लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली परंतु याकडे सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


