सनराईज योगा ग्रुपचा मकरसंक्रांती व हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सनराईज योगा ग्रुपतर्फे मकरसंक्रांती व हळदीकुंकूच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी विशेष कार्यक्रम गडचांदूर शहरात अत्यंत उत्साहात आणि रंगतदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात नगर परिषदेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सौ. शीतल धोटे,सपना शेलोकर, मनीषा परचाके, अर्चना मोरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक व पारंपरिक स्पर्धा. मकरसंक्रांतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या उखाणे स्पर्धेत कांचन ताई लांबट यांनी प्रथम क्रमांक, तर अंजु ताई बिश्वास यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच डंब शराड्स स्पर्धेत सौ. वैशालीताई पारधी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत पहिला क्रमांक पटकावला ,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजू ढेंगळे यांनी प्रभावीपणे केले.कार्यक्रम ची सुरुवात
गुरुमंत्र व स्वागतगीत अर्चना घोटकर व अंजू विश्वास यांनी सादर केले.
प्रास्ताविक कुंतल चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ.पुर्वा धाबेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी हळदीकुंकूच्या केक कटिंगनंतर “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला” या संदेशासह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.परीक्षक म्हणून मनोरमा शेरकी,अर्चना मोरे यांनी अतिशय सुंदर निकाल दिला, नियोजनबद्ध आणि जबाबदारीने कुंतल चव्हाण यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम राबवला. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने गडचांदूर शहरात हा उपक्रम उल्लेखनीय ठरला असून, या सामाजिक उपक्रमा मागे सनराईस ग्रुप चा मोलाचा वाटा आहे.


