25 जानेवारी पासून विश्वकर्मा जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील मढ येथे 25 जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानिमित्य दि. २५ जाने. पासून सकाळी अकरा वाजता ह.भ.प. सुधाकरजी खैरनार/गुजरात,यांच्या सुश्राव्य वाणीतून संगितमय विश्वकर्मा महापुराण सादर होत आहे… याशिवाय रात्री 8 वाजता ह भ प राजेरेश्वर आचार्य काशिविश्वनाथ, ह भ प राम महाराज, सवडद
, ह भ प गणेश महाराज, रनमळे घोडेगाव, ह भ प शिवानी गोविंद धावटेकर, ह भ प गोपालजी महाराज, जैतमळ आखातवाडा , ह भ प शिवरत्न महाराज, राजगुरू, जैतखेड कन्नड, ह भ प विठ्ठल महाराज शिरसाट, भोकरदन, यांचे कीर्तनव प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
1 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ह भ प गजानन महाराज लोणी यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमांनी सप्ताहाची सांगता करण्यात येईल, हरिनाम सप्ताहात भाविकांनी, तसेच सुतार समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक वैजिनाथ राजगुरू, मढ व प्रा विजय रायमल , देऊळगाव राजा यांनी केले आहे.


