ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नीच्या हत्याप्रकरणी पतीला न्यायालयीन कोठडी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील करणकोंडी येथील (२६) वर्षीय विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करून पती अनिल चव्हाण फरार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली होती.याप्रकरणी फरार झालेला मृत्यक महिलेचा पती अनिल चव्हाण यांना जिवती पोलिसांनी अटक करून पत्नीच्या हत्येचा उलगडा केल्याची माहिती जिवती पोलिस निरीक्षक दाराशींग राजपूत यांनी दिली आहे.

           मृत्यक पत्नीच्या भावाने जिवती पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पती अनिल राम चव्हाण यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.रविवारी आरोपी अनिल चव्हाण यांना न्यायालयात हजर केले होते त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.दारूच्या आहारी गेलेल्या आरोपी पती अनिल चव्हाण आदि पासून बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा घटनेच्या दिवशी अनिल दारूच्या नशेत बेधुंद होऊन हातात अंडी घेऊन घरी आला त्यांने मृत्यक पत्नी सगुणा ला अंड्यांची भाजी बनविण्यास सांगितले मात्र शनिवारी महाशिवरात्र असल्याने मृत्यक पत्नी सगुणा अंड्यांची भाजी बनविण्यास नकार देत होती त्यामुळे त्यांच्यात वाद झाले होते.आदिच दारूच्या नशेत फुल्ल असलेला आरोपी अनिल पुन्हा गावातून दारू पिऊन उशिरा घरी आला त्या अगोदरच मृत्यक पत्नीने अंड्यांची भाजी बनवून ठेवली होती मात्र दोघेही रागाने जेवण न करताच झोपी गेले पत्नी सगुणा गाढ झोपेत असताना दोरीने गळा आवळून खून केला व फरार झाला होता मात्र तो पोलिसांच्या तावडीतून सुटू सकला नाही अवघ्या बारा तासांच्या आत फरार आरोपी अनिल चव्हाण ला अटक करून पत्नीच्या हत्येचा उलगडा करण्यात आला आहे.

पत्नीच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली दोरी पोलिसांनी जप्त करून सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने आरोपी अनिल चव्हाण ला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये