ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे मिस जव्हेरी स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे मिस जव्हेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या मिस जव्हेरी स्पर्धेचा शुभारंभ शाळेच्या प्राचार्य असमा खान मॅडम यांनी केले.

 मिस जव्हेरी स्पर्धेमध्ये इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या एकूण 30 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यामध्ये तीन राउंड घेण्यात आले. त्यामधून तीन स्पर्धक निवडण्यात आले. यामध्ये तिसरा क्रमांक कशिश संतोष सिंग बैस (इयत्ता बारावी विज्ञान) सेकंड रनर अप, दुसरा क्रमांक प्रियंका किसान बानोत (अकरावी कॉमर्स) फर्स्ट रनर अप, तर प्रथम क्रमांक लुबेना जाकीर शेख (इयत्ता बारावी आर्ट) हिची मिस जव्हेरी म्हणून निवड करण्यात आली. मिस जव्हेरी हिला Sash व Crown लावून गौरविण्यात आले. या मिस जव्हेरी स्पर्धेचे परीक्षक म्हणून मीनाक्षी अमन कुमार मॅडम (संचालक,टच अँड ग्लो पार्लर, बल्लारपूर) यांनी परीक्षण केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन वैशाली गेडाम मॅडम यांनी केले.

तसेच उमाटे मॅडम, साळवे सर, श्वेता मॅडम, शैलजा मॅडम त्यांनी विशेष सहकार्य केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये