सूर्यांश राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या कवी संमेलनात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन

चांदा ब्लास्ट
सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले.
कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रमोदकुमार अणेराव,प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध कवयित्री पद्मरेखा धनकर,प्रसिद्ध कवी धनराज खानोरकर,पुनीत मातकर,किशोर जामदार,माजी नगरसेवक संजय वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत काव्यमय मैफील रंगली.निमंत्रितांच्या या कविसंमेलनात उपस्थित सर्व कवींनी उत्तमोत्तम कविता सादर करून सभागृहातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी अविनाश पोईनकर, विजय वाटेकर,सुभाष उसेवार, प्रवीण आडेकर,दीपक शिव, पंडित लोंढे,प्रशांत भंडारे,धर्मेंद्र कन्नाके,गोपाल शिरपूरकर,संतोष उईके,बी.सी नगराळे गजानन माद्यसवार,महेश कोलावार, नीरज आत्राम,चंद्रकांत लेनगुरे, केशव कुकडे,एम.ए. रहिम, रोशनी दाते,भाविक सुखदेवे, अनिल पिट्टलवार,नटराज गेडाम,विजय भसारकर, सीमा भसारकर,संगीता पिज्दुरकर, संगीता धोटे,गीता रायपुरे,वैशाली रामटेके,भारती लखमापुरे, रुखसाना पठाण,प्रीती जगझाप, मंजुषा दरवरे,शितल कर्णेवार, हितेश गोमासे, विजय वासाडे, रंगनाथ तालवटकर, प्रभाकर दुर्गे,संजीव बोरकर,वैभव गायनेर,रितेश रावलकर आदी कवींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूर्यांश साहित्य मंचाचे अध्यक्ष इरफान शेख,विवेक पत्तीवार, महेश कोलावार,सुनील बावणे, स्वप्नील मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले.या कवी संमेलनाचे संचालन नरेश बोरीकर यांनी केले तर आभार तनुजा बोढाले यांनी मानले.


