ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कंत्राटी पद्धतीमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन

मागील दोन महिन्यापासून पगार थकीत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज कंत्राटी पद्धती मध्ये काम करणारे सफाई कर्मचारी मार्केट परिसर एकूण 48 पुरुष 12 महिला हे कर्मचारी मागील अनेक वर्षापासून मार्केट परिसराची साफसफाईचा काम कंत्राटी पद्धतीने करत आहे मागील दोन महिन्यापासून पगार थकीत असल्यामुळे सदर कर्मचारी काम बंद आंदोलन वर बसले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांना सफाई कर्मचारी यांनी निवेदन देऊन त्यांना होत असलेला त्रास ची माहिती दिली पगार बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि तत्काळ दखल घेत सफाई कर्मचारी यांना जमा करून नगरपालिका मुख्याधिकारी भगत यांच्या कक्षेमध्ये घेराव आंदोलन केले व तत्काळ नगरपालिका मुख्याधिकारी यांना कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन द्या अशी मागणी केली मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी तत्काळ कर्मचारीचे प्रलंबित दोन महिन्याचे वेतन देण्याची कबुली करत आदेश दिले दोन दिवसात वेतन होणार असे सांगितले असता आंदोलन माग घेण्यात आले सोबतच मुख्याधिकारी नगरपरिषद राजेश भगत यांनी सांगितलं की केंद्र सरकार हे 15 वित्त आयोगाचा पैसा देत नसल्यामुळे हे कर्मचारी स्वच्छता करणारे जो आहे त्यांचे वेतन द्यायचे कसे असा प्रश्न वर्धा नगरपालिका समोर उभा झाला आहे.

आम्ही अनेक पत्र व्यवहार करून 15 वित्त आयोग ची निधी मागणीबाबत वार्तालाप सरकारसोबत करत आहोत पण कुठलाही योग्य उत्तर आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीने आम्हाला मिळाला नाही तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद भगत हे म्हणाले की जर 15 वित्त आयोग चा पैसा मार्च महिन्यापर्यंत आला नाही तर वर्धा शहरात ही साफसफाई पूर्णपणे बंद होऊ शकते अशी भीती आहे कारण की वेतनद्यासाठी नगरपालिका जवळ पैसा आहे नाही मग आम्ही हे कर्मचारीचे वेतन करावे कसे भविष्यात वर्धा शहरात अस्वच्छतेचा त्रास शहराच्या नागरिकांना होऊ शकतो व हे साफसफाई कर्मचारी सुद्धा बेरोजगार होऊ शकते अशी आशंक आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे वर्धा शहर च्या जनतेला घेऊन जन आंदोलन उभा करणार आहे व 15 वित्त आयोग चा पैसा प्रलंबित असलेला केंद्र सरकारने तत्काळ द्यावा हे मागणी करणार आहे.

निवेदन देतानी वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे, शिवसैनिक मिलन भाऊ गांधी, शिवसैनिक अमित भाऊ भोसले, शिवसैनिक संजीव भाऊ पांडे, शिवसैनिक कुमार भाऊ हातागळे, नरेंद्र भाऊ खंडागळे व अन्य सफाई कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये