ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांचा सन्मान

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व जागतिक महिला दिन यांच्या निमित्ताने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दत्ता मेघे फाउंडेशन आणि वर्धा सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व जागतिक महिला दिन यांच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटांचा सन्मान तसेच उत्कृष्ट उद्योग करणाऱ्या महिलांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन विद्यापीठाचे कुलपती माजी खासदार दत्ताजी मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीकांत राठी, शाम परसोडकर, सुधाकरराव मेहरे, सुनील मुरतकर, रवींद्र टप्पे, पुरुषोत्तम खासबागे , गणपतराव मेटकर, अक्षय मेहरे, राजू वानखेडे,राहुल अवथनकर, उपस्थित होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूलवर, विद्यापीठाच्या कुलसचिव श्वेता काळे, जिल्हा उद्योग केंद्र प्रमुख कमलेश जैन, स्वाती वानखेडे, मनीषा मेघे, संचालिका शरद पवार दंत महाविद्यालय, संजय इंगळे तिगावकर जनसंपर्क अधिकारी, ज्योती घंगारे सरपंच घोराड, दामिनी डेकाटे सरपंच हिंगणी यांची प्रमुख उपस्थित होती.

कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पुरोहित, तर कार्यक्रमाचे आभार वर्धा सोशल फोरम सचिव अविनाश सातव यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धा सोशल फोरमचे सदस्य श्याम परसोडकर, रवींद्र टप्पे, छोटू अवथनकर, राजू वानखेडे, श्रीकांत राठी, मोहित सहारे, प्रशासकीय प्रमुख राजेश सव्वालाखे, रूपाली नाईक, सुशांत वानखेडे, राकेश अगडे,यांचे विशेष योगदान लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्धा सोशल फोरमचे सदस्य श्याम परसोडकर, रवींद्र टप्पे, छोटू अवथनकर, राजू वानखेडे, श्रीकांत राठी, मोहित सहारे, प्रशासकीय प्रमुख राजेश सव्वालाखे, रूपाली नाईक, सुशांत वानखेडे, राकेश अगडे,यांचे विशेष योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये