ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्विमिंग पूल बांधण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणूक

देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात पुण्यातील दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 शेतजमिनीत स्विमिंग पूल तयार करून देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपयांची रक्कम उचलून काम न करता आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार देऊळगाव राजा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात पुण्यातील दाम्पत्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी राजेश शिवरतनजी भुतडा (वय ४१, रा. बालाजी नगर, चिखली रोड, देऊळगाव राजा, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन यशवंत कलगे व अमृता सचिन कलगे (दोन्ही रा. प्लॅट नं. ५०५, पाचवा मजला, रॉयल ऑर्चिड, आंबेगाव बु., पुणे) यांनी देऊळगाव राजा येथील फिर्यादींच्या शेतजमिनीत स्वतःच्या स्पेसमध्ये स्विमिंग पूल तयार करून देण्याचे आमिष दाखवले.

दिनांक १७ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान सकाळी ०८.५८ वाजता या कामासाठी आरोपींनी फिर्यादींकडून एकूण ५,००,००० रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे स्विमिंग पूलचे काम न करता आरोपींनी फिर्यादींची आर्थिक फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या तक्रारीची सखोल चौकशी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथून संदर्भ क्रमांक पोअबु/सीआर-१५/फसवणूक/गुन्हा दाखल परवानगी/२०२५-७१, दिनांक ०९/०१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार गणेश यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये