देऊळगाव राजा नगरपालिका विषय समितीच्या सभापतींची निवडीत महायुतीचे वर्चस्व
उबाठाला सुद्धा सुद्धा मिळाले समितीसमध्ये स्थान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महायुती ला देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पद तसेच निर्विवाद बहुमत मिळाले यामध्ये विरोधात असलेल्या उभाठा गटाचे दोन नगरसेवक पालिका निवडणुकीत निवडून आलेले आहेत त्यांनी पालिकेच्या सत्ताकारणामध्ये महायुतीला पाठिंबा दिल्याने दोन पैकी एका नगरसेवकाची विषय समितीच्या सभापती पदी निवड झाल्याने आमदार मनोज कायंदे यांनी पालिकेच्या राजकारणातील सारी पाठावर एक प्रकारे समतोल ठेवला आहे.
देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक अंतिम चरणात असताना न्यायालयाच्याआदेशानुसार काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली होती. परंतु मिळालेला अवधी हा काही उमेदवाराच्या पथ्यावर पडला तर काहींना पराभूत करण्यास कारणीभूत ठरला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये महायुतीच्या माधुरी शिपने यांचा विजय झाला, काही दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या सौ वनिता भुतडा यांची निवड झाली, विषय समितीच्या आज झालेल्या निवडणुकीमध्ये पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे, तसेच नगरपालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी काम पाहिले . नगरपालिकेच्या सत्ता कारणांमध्ये महायुती चे एकूण 12 नगरसेवक निवडून आलेले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 9, भाजपाचे तीन यांची संख्या 12 झालेली असताना उभाठा चे या ठिकाणी दोन नगरसेवक यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने त्यांची सदस्य संख्या एकूण 14 झाली आहेत.
तर माजी आमदारvशशिकांत खेडेकर आणि माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नगर विकास आघाडीचे एकूण सात नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत. एकूण 21 सदस्य संख्या असलेल्या पालिकेमध्ये आज विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापती पदी विष्णू झोरे, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदी ऊ बा ठा चे संदीप शिंदे, शिक्षण समिती सभापती शेख नमी राबी अतिक,. यांची निवड झाली महिला व बालकल्याण समिती सभापती पदी सौ वैशाली विकास कासारे यांची तर उपसभापती पदावर सौ रुकसाना नजीर खान यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष माधुरी शिपने, त्यामध्ये सदस्य म्हणून उपाध्यक्ष सौ वनिता भुतडा, विष्णू झोरे,संदीप शिंदे ,वैशाली कासारे, शेख नमी राबी अतिक, राजेंद्र खांडेभराड यांची निवड झालेली आहेत यावेळी महायुतीचे गटनेते प्रदीप वाघ, तसेच अकोट विकास आघाडी ( नगर विकास आघाडी ) च्या गटनेच्या सौ रंजना रामाने यांच्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती. नवनियुक्त सभापतींचे आमदार मनोज कायंदे यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्तारूढ सरकार मधील आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील नगर परिषद मध्ये एक हाती सत्ता आल्याने शहराचा सर्वांगीण विकास होईल अशी आशा नागरिकांना आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीचे सोडवून किमान एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात येत आहे.



