ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

CRPF अधिकाऱ्याला परत मिळाले त्यांचे हरवलेले मूल्यवान कागदपत्रे व रोख रक्कम

"इमानदारी की मिसाल" : सुरज शहा व सुमित हस्तक यांचा प्रामाणिकपणा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना रस्त्यावर काही कागदपत्रे व रोख रक्कम मिळाली. त्या वेळी त्यांनी चौकशी केली असता माहिती मिळाली की सदर कागदपत्रे व रोख रक्कम यादव किसन बागडे नामक CRPF अधिकाऱ्याचे असल्याचे समजले.

त्या दोघांनी विलंब न करता तत्काळ CRPF अधिकाऱ्याला संपर्क करून ते कागदपत्रे व त्यांची रोख रक्कम सुखरूप CRPF अधिकाऱ्यापर्यंत पोहचविली. त्या अधिकाऱ्यांनी सुरज शहा व सुमित हस्तक यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना मिळालेले कागतपत्रे व पैसे प्रामाणिकपणे त्यांना मिळवून दिल्याने त्यांनी या दोघांचेही मनापासून आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये