ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर संपन्न ; शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

भद्रावतीत केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           केरलीय पंचकर्म ट्रेनिंग इन्स्टिट्यूट द्वारा निःशुल्क दर्द रोग निवारण शिबिर दि.४ फेब्रुवारी ला स्थानिक हनुमान मंदिर, संताजी नगर येथे संपन्न झाले.

         डॉ. लोहर्णा मंगरुळकर, डॉ. अभिनव आकरे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिराचा जवळपास शंभरहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

             यामधे वातदोष, लकवा, पाठीचे दुखणे, मानेचे दुखणे, कंबर दुखी, गुडघेदुखी, सायटिका, नस लागणे, हाला हाळांमधिल गॅप, मायग्रेन, झोप न येणे डिप्रेशन, चक्कर येणे, जुनी डोकेदुखी, जुनी सर्दी, दमा, एलर्जी, श्वास फुलने, अपचन, पाईल्स, फिशर, आदि रोगांवर पंचकर्माच्या माध्यमातून उपचार करण्यात आला.

             या शिबिराला यशस्वी करण्यासाठी डॉ. समृद्धी मंगरुळकर, डॉ. वैष्णव मंगरुळकर, प्रा. रविकांत वरारकर, रितेश वाढई, कवीश्वर शेंडे, प्रशांत झाडे, चंद्रशेखर मंगरुळकर, सुनील डांगे, संजय मंगरुळकर, दीपक निकुरे, मिथिलेश लाखे, गुलशन आष्टनकर, पुरुषोत्तम नैताम, गोपाळ ताजने, मंगेश अंड्रस्कर, अनिल तुमसरे, युगेश खोब्रागडे, नौशाद अली, छोटू धकाते, शिवा कोंबे, महेश कोथळे, निखिल तुमसरे, गौरी बिलोरे, आदींनी परीश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये