Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक 29आगस्ट ला राष्ट्रीय क्रीडा दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बबन भोयर, शारीरिक शिक्षक, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा निर्देशक डॉ. अनिस खान सर यांनी केले होते. कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोहर बांद्रे यांनी केले.

मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून २०१२ पासून देशभर साजरा करण्यात येतो. २९ ऑगस्ट १९०५ मध्ये जन्मलेल्या ध्यानचंद यांनी आपले संपूर्ण आयुष्य हॉकी साठी वेचले. ऑलिम्पिक खेळात देशाला तीनवेळा सुवर्ण पदक मिळवून दिले. हॉकीचे जादूगार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद यांचा जीवन इतिहास प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून सांगितला. त्यासोबतच दैनंदिन खेळातून आपले शरीर व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मदत होते. भविष्यातील चांगल्या आयुष्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावे यासाठी महाविद्यालय स्तरावर हा कार्यक्रम घेण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. घोडीले सरानी पाहुण्यांचे, अध्यक्षाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये