Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर येथे धावत्या बसमधून उडी घेतल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

धावत्या बसमधून उडी घेतल्याने एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला 30 आगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजताच्या दरम्यान घटना घडली. राकेश इंद्रजीत पटेल ( 25 ) राहणार रिवा, मध्य प्रदेश असे मृत तरुणाचे नाव आहे.

मृतक राजुरा गोविंदपुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर चालक म्हणून कार्यरत होता. एक वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. बस मध्ये बसून पत्नी आणि दोन सोयरे त्यांच्यासोबत गडचांदूर वरून चंद्रपूरच्या दिशेने जात होता. गडचांदूरच्या बस स्टँड पासून काही अंतरावर अचानक त्यांनी धावत्या बसमधून उडी घेतली असता त्याचा जागीच मृत्यू झाला. तो खिर्डी येथे पत्नीसोबत किरायाने राहत होता.

त्याने अचानक उडी का घेतली याचे कारण अजून पर्यंत कळले नाही. नागरिकांनी त्याला जखमी अवस्थेत त्याच बसमधून ग्रामीण रुग्णालय येथे नेले. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे सहकार्यासह रुग्णालयात पोहोचले. पंचनामा करून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या गावी पाठवण्याची व्यवस्था तसेच काही पैशाची मदत उपसरपंच दीपक खेकारे, अरविंद बावणे यांनी ठेकेदाराच्या संबंधित कर्मचाऱ्यांशी बोलून करून दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये