Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर जिल्ह्यात शासनाच्या गव्हाची खुल्या बाजारात विक्री

गावकऱ्यांनी दुकांदाराचा गैरप्रकार हाणून पाडला.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथून शासनाच्या तांदळाची दुसऱ्या राज्यात विक्री करणार मोठं नेटवर्क पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ही रेशन दुकानदार दुकानातील शासनाच्या तांदळाची खुल्या बाजारात विक्री करीत आहे, असाच एक प्रकार कोरपना तालुक्यातील धामणगाव येथे नागरिकांनी उघडकीस आणला.

स्वस्त धान्य विक्रेता नामे राजेश दतात्रय ढगे यांनी मागील जानेवारी महिन्यापासून गावातील नागरिकांची दिशाभूल करीत लोकांना 9 महिन्यापासून गहू दिले नव्हते. गावातील नागरिक दर महिन्याला गहुची मागणी करीत असता राजेश दतात्रय ढगे कडून शासनाकडून गहू आले नाही. असे उत्तर मिळत होते. व नागरिक त्यांचा भूलथापांना बळी पडले व याचा फायदा घेऊन राजेश दतात्रय ढगे नीं दर महिन्याला येणारे सरकारी गहू विकण्यास सुरू केले.

असाच प्रकार खूप महिन्यापासून सुरू होता पण 27 ऑगस्ट रविवार ला दुपारी 1.00 वाजता गहू विकण्याचा प्रकार सुरू होता, स्वस्त धान्य दुकान बेकायदेशीर विक्री करीत गहुचे कट्टे वाहन क्रमांक MH 34 AB 3064 या चारचाकी वाहनमध्ये गहू भरतांना गावातील नागरिकांच्या लक्षात आले.

ही बाब लक्षात येताच गावातील नागरिकांनीं पोलिसांकडे तक्रार केली. स्वस्त धान्य दुकानदार मागील 9 महिन्यापासून नागरिकांचे हक्काचे गहू विकत आहे. गहू मिळत नसल्याने अनेक जण खाजगी दुकानातून गहू जास्त किमतीत विकत घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. गावामध्ये अनेक नागरिक हे मजूर वर्ग आहेत.

दिवसभर मजुरी करून पैसे कमावतात त्यात शासनाकडून मिळणाऱ्या योजना हे असले चोरटे स्वस्त धान्य दुकानदार शासनाला व नागरिकांना भूलथापा देऊन स्वतःचे खिसे भरत असतात. अश्या दुकानदारांना कठोर शिक्षा व स्वस्त धान्य दुकान परवाना निलंबित करण्यात यावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये